क्षुल्लक कारणावरून पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | बातमी घेण्यासाठी निवेदनाची प्रत मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरून दैनिक भास्करचा प्रतिनिधी सूर्यकांत कदम यांच्यावर दोघांनी हल्ला चढवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात दोघांविरुद्व तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील पिंपरखेड येथील रवींद्र दिलीप मोरे व सिद्धार्थ दिलीप मोरे या दोघांकडून बातमी प्रकाशित करण्यासाठी दैनिक भास्करचे प्रतिनिधी सूर्यकांत कदम यांनी निवेदनाची प्रत मागितली. याचाच राग आणून रवींद्र दिलीप मोरे यांनी तू कोणाच्याही बातम्या छापल्या तर मला काही फरक पडत नाही. आमच्या नांदी लागला तर चाळीसगावात येऊन तुला मारून टाकू अशी धमकी दिली. तसेच त्याचा भाऊ सिद्धार्थ दिलीप मोरे हा कदम यांच्या अंगावर धावून आला. व आता तुला सोडणार नाही. तुझे हातपाय तोडून टाकू अशी धमकी देत शिवीगाळ करून झटापटी केली. सदर घटना गुरुवार (ता. १५) रोजी दुपारी १:१५ वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात सूर्यकांत कदम यांच्या फिर्यादीवरून वरील दोघांविरुद्व तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

 

 

Protected Content