अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेनेच्या धर्मवीर अध्यात्मीक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी पोलीस उपअधिक्षक राकेश जाधव यांच्यासोबत चर्चा केली.
अक्षय महाराज भोसले यांनी राकेश जाधव यांच्यासोबत चर्चा केली. यात अमळनेरसह परिसरातील काही गुन्ह्यांबाबत चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका प्रकरणाचा संदर्भ घेऊन चर्चा करण्यात आली. या प्रकरणी दोन हिंदू आणि तीन मुस्लीम समाजातील आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत बोलतांना अक्षय महाराज भोसले यांनी सांगितले की, शिंदे साहेबांचे नेतृत्वात इथे प्रत्येकाला १०० टक्के न्याय मिळणार व शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना त्यासाठी कटीबद्ध आहे . या अनुषंगाने पाचोरा भडगाव विधानसभेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याशी देखील फोन द्वारे संवाद झाल्याची माहिती त्यांनी दिली.
याबाबत चर्चा करतांना अमळनेर पोलीस उप अधीक्षक राकेश जाधव यांनी पुन्हा काही वाद निर्माण होतील असे कारण देत अटक झाली नाही हे मान्य केले मात्र तातडीने कारवाई करतो असे आश्वस्त केले. लवकरच संपूर्ण घटनेचा अहवाल ते सादर करतील. अमळनेरच्या इतरही नानाविध विषयांवर जाधव यांच्याशी चर्चा झाली. यावेळी अमळनेर शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश पवार व मंगळ ग्रह मंदिर अध्यक्ष डिगंबर महाले, पत्रकार रवींद्र मोरे उपस्थित होते.