कौटुंबिक वादातून सुप्रीम कॉलनीत पतीकडून पत्नीला मारहाण

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील सुप्रीम कॉलनी येथे माहेर आलेल्या पत्नीला लाथाबुक्क्यानी मारहाण करून शिवीगाळ करत दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवार 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अनिस शरीफ बिस्ती (वय 25, रा. पोलीस कॉलनी, सुप्रीम कॉलनी जळगाव) हे आपल्या पत्नीसह वास्तव्याला आहे. त्यांच्या कौटुंबिक व किरकोळ भांडणातून त्यांची पत्नी माहेरी निघून गेल्या. दरम्यान अनिस शरीफ बिस्ती हा पत्नीच्या घरी 4 नोव्हेंबर रोजी रात्री 1 वाजता गेले त्यांच्यात पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद झाला. या वादातून अनिस बिस्ती याला राग आल्याने त्याच्या पत्नीला चापटाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच बाजूला पडलेले वीट सासूच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली.

याप्रकरणी सासू ज्योती प्रकाश ठाकूर रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव यांच्या फिर्यादीवरून जावई अनिस बिस्ती याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय धनगर करीत आहे.

Protected Content