धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील शेतकऱ्याला घरातील कौटुंबिक वादातून एका तरुणाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवार २२ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी १२ वाजता धरणगाव पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावात शशिकांत धोंडू पाटील वय-४२, हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. कौटुंबिक वादातून गावात राहणारा कैलास रघुनाथ पाटील याने सोमवार २२ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता शशिकांत पाटील याला शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शशिकांत पाटील याने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी कैलास रघुनाथ पाटील रा. चिंचपूरा ता. धरणगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजीव गोडी हे करीत आहे.