‘कोविड 19’ च्या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी डॉ. संजय ओक यांची नियुक्ती !

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी डॉ. संजय ओक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांच्या पातळीवर मुंबईतील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टरांना टास्क फोर्स तयार केला आहे. यातील डॉक्टर हे राज्यातील कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या टास्क फोर्सच्या अध्यक्ष डॉ. संजय ओक हे आरोग्य तज्ज्ञ आहेत. त्यांनी आज केईएम रुग्णालयात पदभार स्विकारला. ते केईएम रुग्णालयाचे माजी डीनही होते. या टास्क फोर्समध्ये डॉ. संजय ओक, कुलगुरू, डॉ. डी वाय पाटील विद्यापीठ, डॉ. झहीर उडवाडिया, हिंदुजा रुग्णालय, डॉ. नागांवकर, लिलावती रुग्णालय, डॉ . केदार तोरस्कर , वोक्हार्ट रुग्णालय, डॉ . राहुल पंडित, फोर्टीस रुग्णालय, डॉ. एन. डी. कर्णिक, सायन रुग्णालय, डॉ . झहिर विरानी, पी.ए.के. रुग्णालय, डॉ . प्रविण बांगर, केईएम रुग्णालय, डॉ . ओम श्रीवास्तव, कस्तुरबा रुग्णालय या नऊ डॉक्टरांचा समावेश आहे.

Protected Content