जळगाव प्रतिनिधी । येथील कोविड रूग्णालयातील बाथरूममध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याची अतिशय गंभीर दखल घेण्यात आली असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनसह सात अधिकार्यांनी निलंबीत करण्यात आल्याची माहिती खासदार उन्मेषदादा पाटील यांनी दिली आहे.
आज आधी बेपत्ता म्हणून घोषीत करण्यात आलेल्या महिला रूग्णाचा मृतदेह बाथरूममध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात खासदार उन्मेषदादा पाटील यांनी आरोग्य विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी चर्चा केली असता या प्रकरणी डीनसह सात जणांना निलंबीत करण्यात आल्याची माहिती खासदारांनी दिली आहे. यात डीन भास्कर खैरे यांच्यासह दोन अधिक्षक व पाच प्राध्यापकांना निलंबीत करण्यात आल्याची माहिती खासदार उन्मेषदादा पाटील यांनी दिली आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/585228259094770