Home धर्म-समाज कोळवद येथे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात

कोळवद येथे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात

0
37

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील कोळवद येथे माजी गृहमंत्री भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान कोळवद यांच्या वतीने भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले.

या शोभायात्रेत उपस्थित राहून लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले व शोभायात्रेत सहभाग घेतला.

या प्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या सविता अतुल भालेराव, यावल पंचायत समितीचे माजी उपसभापती योगेश भंगाळे, आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे, आदीवासी समाजातील कार्यकर्ते सलीम तडवी, याकूब तडवी, प्रल्हाद चौधरी, मनीषा चौधरी, संजू कोळी, भगवान पाटील, मंगला महाजन, मनीषा भिरूड, दिपक पाटील , अजय वारके, तुषार चौधरी इ उपस्थित होते.

तसेच वड्री तालुका यावल येथील सरदार वल्लभाई पटेल मित्र मंडळ यांच्या वतीने लोहापुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेस उपस्थिती राहून लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

यावेळी हर्षल पाटील, सविताताई भालेराव, योगेश भंगाळे, डॉ. कुंदन फेगडे , वड्री ग्रामपंचायत सरपंच अजय भालेराव, पंकज चौधरी इतर ग्रामस्थांसह समाज बांधव उपस्थित होते.


Protected Content

Play sound