यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कोळवद येथे सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केन्द्रा अंतर्गत येणाऱ्या आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात आरोग्यवर्धिनीचा ४ थ्या वर्धापनदिनानिमित्त शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरास ग्रामस्थांचा उत्तम असा प्रतिसाद मिळाला.
यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे , वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे , डॉ. नितीन सोनवणे प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिम यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. साजिद तडवी, तालुक्यातील सावखेडासिम प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत उपकेंद्र कोळवद येथे विविध कार्यक्रमांचे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात टेलिकन्सल्टेशन, आरोग्य तपासणी शिबीर, योग सत्र याचे आयोजन करण्यात आले. शिबिराची सुरुवात ग्रामपंचायत सरपंच याकुब तडवी यांच्या हस्ते करण्यात आले. शिबीरात सरपंच व सदस्य यांनी तपासणी करून घेतली. सरपंच याकुब विनायक तडवी, उपसरपंच शशिकांत नारायण चौधरी, सदस्य अनिल प्रल्हाद पाटील, विठ्ठल पंढरीनाथ सूर्यवंशी, मंगला मिठाराम महाजन, मुमताज फतु तडवी, लिलाबाई प्रकाश सूर्यवंशी , आरती गजानन अढायागे, जनाबाई भास्कर बाऊस्कर, मिनाक्षी निवृत्ती भिरूड, मनिषा वसंत महाजन, ग्रामसेवक व्ही. एल.पाटील, ग्राम पंचायतीचे पदाधिकारी, कर्मचारी व आशा सेविका उपस्थित होत्या. जनजागृती व शिबीर यशस्वीतेसाठी समुदायआरोग्य अधिकारी डॉ. साजिद तडवी, आरोग्य सेविका महेमुदा तडवी, आरोग्य सेवक भुषण पाटील, आशासेविका छाया वाघुळदे, उषा कोळी, सरला हिराबाई तडवी, सायरा तडवी यांनी शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कामकाज पाहीले.