भडगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था, भडगाव संचलीत, गोपीचंद पुना पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोळगाव येथे ‘साधनाई स्नेह संमेलन २०२०’ विद्यार्थ्यांच्या प्रचंड अशा उत्साहात पार पडले.
गोपीचंद पुना पाटील विद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालयात ‘साधनाई संमेलना’चे उद्घाटन संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी जि. प. सभापती विकास पाटील, भडगाव पंचायत समिती सभापती हेमलता पाटील, अवर सचिव प्रशांत पाटील, दुध फेडरेशन संचालिका पुनम पाटील, गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, स्थानिक शाळा समिती चेअरमन ओंकार पाटील, युवराज पाटील, संजय पाटील आदि उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्वप्रथम दैनिक सकाळतर्फे अचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र पुरस्कार प्राप्त प्रतापराव पाटील यांचा सत्कार प्राचार्य आर. एस. पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. दुसऱ्यांदा भडगाव पंचायत समिती सभापती बिनविरोध निवड झालेल्या हेमलता पाटील यांचा तसेच राष्ट्रीय कुराश स्पर्धेत कांस्यपदक पटकाविणाऱ्या नेहा गोविंद महाले, विभागस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झालेल्या गणेश महाजन यांचा विशेष सत्कार प्रतापराव पाटील तसेच इतर मान्यवरांच्या यांच्या हस्ते करण्यात आला. ‘साधनाई’ या चार तास चाललेल्या रंगारंग कार्यक्रमात संस्थेच्या कोळगाव येथील सर्वच शाखातील म्हणजेच न्यू इंग्लिश मेडियम स्कूल, गोपीचंद पुना पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या तसेच कला महाविद्यालयाच्या २०० ते २५० विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक महोत्सवाद्वारे आपली कला सादर केली. यावेळी विद्यार्थ्यांनी गीत गायन, समुह गीते, एकल नृत्य, समूह नृत्य, लावणी, गरबा, लोकगीत, एकपात्री नाटिका, समाज प्रबोधनपर नाटिका आदि प्रकार सादर केलेत. कार्यक्रमास जवळपास साडे तीन हजार प्रेक्षक उपस्थित होते. सूत्रे आबासाहेब कोळगावकर, एस. ए. वाघ, चेतन भोसले, योगेश बोरसे, सोनाली सोनवणे, पी. यु. पाटीलआदिंनी यशस्वीपणे सांभाळली तर आभार प्रशांत पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी न्यू इंग्लिश मेडियम स्कूल,गोपीचंद पुना पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच वरिष्ठ कला महाविद्यालयाच्या,यशवंतराव चव्हाण मुक्त महाविद्यालयाच्या प्राध्यापक-प्राध्यापिका,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कामकाज पहिले.