कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न !

कोल्हापूर (वृत्तसंस्था) कोल्हापूर जिल्ह्यातील चार कुटुंबांतील सदस्यांनी अंगावर रॉकेल ओतून आज स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महदनाचा प्रयत्न केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. सुदैवाने पोलिसांनी या सर्वांना वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

 

आंदोलनकर्ते कुटुंबीयातील मारुती भालकर यांनी सांगितले की, पाचगाव रस्त्यावरील डिव्हिजन सर्वे क्रमांक तीन येथे एकाच प्लॉटच्या उताऱ्यावर तिघांची नावे नोंद झाली आहे. यासाठी पाचगाव ग्रामपंचायत, करवीर तहसील, प्रांत ऑफिसकडे याबाबत तक्रार केली आहे. बेकायदेशीर उतारा रद्द करावा, अशी मागणी आम्ही केली आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भालकर यांनी केला आहे. वारंवार जिल्हा प्रशासनाकडे याबाबत न्याय मागितला असता जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे असून जिल्हा प्रशासन टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप या कुटुंबीयांनी केला आहे.

Protected Content