कोर्ट चौकातून वकीलाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कोर्ट चौकातील रोडवर पार्किंगला लावलेली वकीलाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबबात अधिक माहिती अशी की, हेमंत प्रकाश दाभाडे (वय-४८) रा. गुरूदत्त कॉलनी, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. जिल्हा न्यायालयात वकील म्हणून व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे गुरूवार ४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ते त्यांच्या दुचाकी (एमएच १९ एजी ५७६) ने कोर्ट चौकात आले. त्यांनी त्यांची १० हजार रूपये किंमतीची दुचाकी पार्क करून कार्यालयीन कामासाठी निघून गेले. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी पार्किंगला लावलेली दुचाकी चोरून नेली. दुपारी २ वाजता ते जागेवर आले असता त्यांना दुचाकी मिळून  आली नाही. सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर सोमवारी ८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश बोरसे करीत आहे.

 

 

Protected Content