जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासन उपाययोजना करत आहे. बाहेरून आलेल्या नागरिकांची वैद्यकिय तपासणी केल्यानंतर होम क्वारंटाईन केले असतांना मास्क न लावणे आणि बाहेर विनाकारण फिरणाऱ्या चौघांवर रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुमित बनसोडे आणि एक महिला (नाव गाव पुर्ण माहित नाही) हे गोधवली ता. भिवंडी जि.ठाणे येथून आले होते. या दोघांना साहील पठाण आणि आदील खान यांनी १५ मे रोजी जळगावात आणले. त्यानंतर जिल्हा कोवीड रूग्णालयात वैद्यकिय अधिकारी यांनी तपासणी केली. त्यानंतर चौघांना होम क्वारंटाईन केले. असे असतांना सर्वजण नियमांचे उल्लंघन करत मास्क न लावणे, घराबाहेर विनाकारण फिरत असतांना आढळून आल्याने साहील पठाण (वय-२६) रा.पाळधी, ता.धरणगाव ह.मु.समतानगर, जळगाव, आदील नवाज खान (वय-२४), एक महिला (नाव गाव पुर्ण माहित नाही) आणि सुमित बनसोडे सर्व रा.शिवमंदीर, समतानगर, जळगाव यांच्यावर भादवि कलम १८८, २६९, २७० अन्वये रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, स.पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंद नगर पोलीस ठाण्याचे सपोनि मनोजकुमार राठोड, पोकॉ अतुल पवार, पोना नरेंद्र पाटील यांनी कारवाई केली.
जिल्ह्यात करोना विषाणू (कोवीड १९)चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधातम्क उपाय योजना म्हणून सर्व पोलीस स्टेशन हद्दीत कोणीही नागरिक यांना अत्यावश्यक बाब वगळता अनावश्यक रित्या फिरण्यास, मुक्तपणे संचार मनाई केलेली आहे. तरी नागरिकांनी शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन करावे, कायद्याचे उल्लंघन केल्यास गुन्हादाखल करण्यात येईल.
-डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव