कोरोना : सातपुडा परिसरात बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची तपासणी

 

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडा सिमचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नसीमा तडवी यांच्यासह वैद्यकीय पथकाने सातपुडा परिसरातील अतिदुर्गम भागात असलेली गावे व पाड्यांवर मोहराळा , हरीपुरा , जामुनझिरा , व दहिगाव येथील विलगीकरण कक्षास भेट देउन तपासणी केली.

कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या पार्श्वभूमीवर आजाराचे प्रादुर्भाव टाळण्यासाठी आरोग्य प्रशासनाने परवानगी दिल्यामुळे शहरात नोकरी , व्यवसायसाठी आणि कामानिमित्त बाहेरगावी किंवा परप्रांतात व शहरात असलेले व्यक्ती कामगार आप आपल्या मूळ गावाकडे परतू लागले असून त्यांची संख्या सातत्याने आता वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभाग ही सतर्क झालेला आहे. यावेळी सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्र च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नसीमा तडवी यांनी विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्तींची तपासणी केली व क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला. तसेच यावेळी नियमित मास्क वापरणे व १४ दिवस विलगीकरण कक्षात रहावे. तसेच प्रत्येक गावात बाहेरून येणाऱ्यांची नोंद ठेवावी अशा सूचना यावेळी डॉ. तडवी यांनी केले. यासाठी वैद्यकीय पथकात वैद्यकीय अधिकारी डॉ. नसीमा तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्राचे निर्माण अधिकारी प्रवीण सराफ , आरोग्य पर्यवेक्षिका भूमिका सोनवणे, आरोग्य सेवक संजय तडवी, आरोग्य सेविका जुगरा तडवी, कल्पना पाटील , समीर तडवी आदी सहभागी होते. यावेळी मोहराळा येथील सुपडू तडवी , पोलीस पाटील, युवराज पाटील , ग्राम विकास अधिकारी श्री. चिमणकर, संजय पाटील , आशा सेविका निर्मला पाटील , योगिता पाटील, नजमा तडवी आदी उपस्थित होते.

Protected Content