मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरसचा फैलाव वाढत असल्याने राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्यासह सर्व परीक्षाही पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबईत आणखी ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ३८ वर पोहचल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच राज्यातील शाळा, महाविद्यालय बंद करण्यासह सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी सूचना कुलगुरु आणि संबंधित विभागांना देण्यात आल्याची माहिती देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात येतील का? यासंबंधी निवडणूक आयोगाकडे विचारणा केली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.