कोरोना संशयित महिलेच्या मृत्यूनंतर हिंगोण्यात जनता कर्फ्यू

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणे येथील वृध्द महिलेचा कोरोना सदृश्य आजाराने मृत्यू झाल्यानंतर या गावात तीन दिवसीय जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे.

यावल तालुक्यातील हिंगोणा गावातील राहणार्‍या एका ७४ वर्षीय सेवानिवृत शिक्षक महीलेस कोरोनाचे लक्षणे दिसु लागल्याने तिला उपचारार्थ सावदा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिचा आज मृत्यु झाला आहे. तिचे अंतीम संस्कार हे सावदा येथेच करण्यात आले असुन, या संदर्भात खबरदारीचा उपाय म्हणुन आरोग्य विभाग व फैजपुरचे मंडळ अधिकारी जे. डी. भंगाळे यांनी तात्काळ हिंगोणा येथील त्या मृत झालेल्या महीलेच्या कुटुंबातील पाच लोकांना क्वॉरंटाईन करण्यात आले असुन त्यांना फैजपुर येथे पाठविण्यात आले आहे. दरम्यान प्रांताधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांच्या आदेशाने हिंगोणा गावात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. याबाबतची सुचना गावात ग्रामपंचायतच्या वतीने दवंडी देवुन देण्यात आली आहे. तर, या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय संपुर्ण परिसराची फवारणी करण्यात आली असून ग्रामस्थांनी घराबाहेर न पडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान काल फैजपुर शहरात दोन पॉझीटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर हिंगोणा येथील महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी हिंगोणे येथील ग्रामस्थांना स्वयंस्फुर्तीने जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. लोकांनी सॅनिटायझर व मास्कचा वापर करून फिजीकल डिस्टन्सींगचे पालन करण्याची गरज आहे. तसेच लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नका असे आवाहन देखील प्रांताधिकार्‍यांनी केले आहे.

Protected Content