शिर्डी (वृत्तसंस्था) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शिर्डी येथील साई समाधी मंदिर आज, मंगळवारी दुपारी ३ वाजल्यापासून बंद ठेवण्याचा निर्णय साई संस्थानाने घेतला आहे.
मंदिर बंद होणार असले तरी ऑनलाइन दर्शन, लाइव्ह टेलिकास्ट व संस्थानचे कार्यालयीन कामकाज सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. साईनगरीतील साईभक्तांची संख्या रोडावल्याने दररोज दोन ते तीन कोटी रुपयांची उलाढाल होणार्या शिर्डी शहरात ‘कोरोना’मुळे व्यवहार ठप्प झाले आहेत. दरम्यान, पुढील आदेश येईपर्यंत साई मंदीर, प्रसादालय आणि भक्तनिवास देखील बंद राहणार आहे. मात्र, मंदिर बंद होण्याआधी भाविकांनी शेवटच्या आरतीसाठी आज मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.