Home आरोग्य कोरोना कहर : जिल्ह्यात नव्याने ३४४ रूग्ण आढळले; एकाचा मृत्यू

कोरोना कहर : जिल्ह्यात नव्याने ३४४ रूग्ण आढळले; एकाचा मृत्यू

0
33

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात आज ३४४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. आज एका कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे तर १५७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 

तालुकानिहाय आकडेवारी
जळगाव शहर-६९, जळगाव ग्रामीण-१५, भुसावळ-५५, अमळनेर-२, चोपडा-५२, पाचोरा-१५, भडगाव-१, धरणगाव-७, यावल-१३, एरंडोल-११, जामनेर-१०, रावेर-२०, पारोळा-१३, चाळीसगाव-२३, मुक्ताईनगर-१२, बोदवड-१७ आणि इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण ३४४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

 

जिल्ह्यात आज एकुण १५७ रूग्ण कोरोनामुक्त झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४८ हजार २२९ रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १ लाख ४२ हजार २१६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ४३० बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे, आज एका बाधित रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आता एकुण २ हजार ५८३ आकडा मृत्यूचा झाला आहे. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.


Protected Content

Play sound