कोरोना विरोधातील लढ्यात हलगर्जीपणा नको

 

नवी दिल्ली । वृत्तसंस्था । कोरोना आटोक्यात आल्याचा आभास होत असला तरी जोवर लस येत नाही तोवर हा लढा कायम राहणार असून यात जराही हलगर्जीपणा नको असा इशारा आज पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित करतांना दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी देशाला संबोधित केले. याप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात कोरोनाचा प्रकोप कमी झाला असला तरी लॉकडाऊन संपलेला नाही. यामुळे बेफिकिरी नको असा इशारा त्यांनी दिला. अलीकडच्या काळात आपल्याला दिसून येत आहे की, देशात अनेक ठिकाणी मास्कविना अनेक लोक बाहेर पडत आहेत. कोरोना संपल्याचा आभास होत असल्याचे आपल्याला वाटत असले तरी ही बाब अतिशय घातक आहे. या महामारीवर लस येत नाही तोवर आपण जराही निष्काळजीपणा नको.

सध्या देशातील कोरोनाचा रिकव्हरी रेट चांगला आहे. कोविड योध्दे अतिशय तळमळीने काम करत आहेत. तरीही जोवर लस येत नाही तोवर ही लढाई संपणार नाही. या अनुषंगाने प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियात कार्यरत असणार्‍यांनी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी अशी अपेक्षा देखील पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संबोधनातून व्यक्त केली.

Protected Content