मुंबई प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या कालावधीत अनेकांची गैरसोय होत असली तरी कोरोनाच्या प्रतिकारासाठी हे आवश्यक असल्याचे सांगत ही लढाई आपण जिंकणारच असल्याचा आत्मविश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोरोनाच्या अपडेटबाबत माहिती दिली. ते म्हणले की, लॉकडाऊनच्या कालावधीत अनेकांची गैरसोय होत आहे. विशेष करून यामुळे अनेक ठिकाणी मजूर अडकून पडले आहेत. मात्र त्यांच्यासाठी आता सुविधा देण्यात येत आहेत. त्यांनी आहे तिथेच थांबण्याची गरज आहे. राज्यातील कोरोनाचा रूग्ण वाढत असले तरी आपण हे युध्द जिंकणार असल्याचा आत्मविश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. राज्यात अन्न-धान्याचा तुटवडा निर्माण होणार नाही यासाठी राज्य सरकार काळजी घेत असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवभोजन हे अवघ्या पाच रूपयात उपलब्ध करण्यात आले असून याची मर्यादा वाढविण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००