कोरोना लॉकडाऊन : इचलकरंजीत दारु मिळत नसल्यामुळे एकाची आत्महत्या

इचलकरंजी (वृत्तसंस्था) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे दारु मिळत नसल्याने हताश झालेल्या यंत्रमाग कामगाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरातील इचलकरंजीत घडली आहे.

 

‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दारुची दुकाने बंद आहेत. यामुळे इचलकरंजीमध्ये दारु मिळत नसल्याच्या कारणातून यंत्रमाग कामगाराने आत्महत्या केल्यानंतर नातेवाइकांनी आक्रोश केला. दरम्यान, केरळमध्येही दारुची दुकाने बंद असल्याने दारुच्या आहारी गेलेल्या पाच तळीरामांनी पाच दिवसात आत्महत्या केल्याच्या चिंताजनक घटना समोर आल्या होत्या.

Protected Content