जळगाव प्रतिनिधी । शहरात शनिवारी रात्री उशीरा कोरोना रूग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली होती. मात्र संबंधित रूग्णाचा रिपोर्ट व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्याने एकावर जिल्हा पेठ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हातील हा पहिला गुन्हा आहे.
याबाबत माहिती अशी की, शनिवार २८ मार्च रोजी जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात नागपूर येथून तीन जणांना कोरोनाचा रिपोर्ट आला. त्यात एकाचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर काही वेळातच तपासणी अहवाल सोशल मीडियावर रात्री १०.३० वाजता व्हायरल झाला होता. तपासणी अहवाल व्हायरल होवुन संबंधित रुग्णाची ओळख समोर आली. त्यामुळे शासनाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यामुळे आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी अहवाल व्हायरल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे पोलिस प्रशासनाला दिले होते. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक उमेश पाटील यांच्या फिर्यादीवरून भादवि कलम १८८ चे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तपासणी अहवाल व्हायरल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोहेकॉ ज्ञानेश्वर पाटील करीत आहे.