जळगाव प्रतिनिधी । शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कोवीड केअर सेंटरमध्ये गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू असलेल्या तरूणाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह येताच बाधित तरूणाने क्वारंटाईन सेंटरमधून पळ काढला. गणेश कॉलनीतील रहिवाशी असलेल्या तरूण रूग्णाचा रात्री उशीरापर्यंत शोध सुरू होता.
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. कोणत्याही वयाच्या व्यक्तीस कोरोनाची लागण होत आहे. लक्षणे जाणवायला लागल्यानंतर तपासणीसाठी येणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या काही दिवसात कोविड केअर सेंटरमधून पळून जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी गणेश कॉलनी परिसरातील स्वामी समर्थ मंदिराच्या परिसरातील रहिवासी तरुण महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाला होता. सायंकाळी अँटिजेन टेस्ट केल्यानंतर त्या तरुणाचा अहवाल पाॅझिटिव्ह अाला. त्यामुळे इतर पाॅझिटिव्ह १४ रुग्णांसाेबत त्या तरूणालाही पाॅझिटिव्ह रुग्णांच्या सेंटरमध्ये घेऊन जाण्यासाठी बसमध्ये बसवले. दरम्यान, काही क्षणात त्या तरुणाने बसमधून बाहेर पडत मोटारसायकलवरून पलायन केले. केअर सेंटरमधील डाॅक्टर, कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.