Home आरोग्य कोरोना : राज्यात रुग्णांची संख्या १४७ वर !

कोरोना : राज्यात रुग्णांची संख्या १४७ वर !


मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १४७ वर पोहोचली आहे. आज सांगलीत आणखी १२ रूग्ण कोरोना पॉजिटिव्ह आल्याने हा आकडा आज १२ ने वाढला. तर देशात ७२४ प्रकरणे समोर आली असून आतापर्यंत 20 जणांचा कोरोनामुळे बळी गेलाय.

 

सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता ११ वरुन २३ वर पोहोचली आहे. आज ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यांच्यामध्ये ६ महिला आणि ६ पुरुष यांचा समावेश आहे. हे सर्व इस्लामपूरमधील एकाच कुटुंबातील व्यक्ती आहेत. आरोग्य मंत्रालयानुसार देशात कोरोना संसर्गाचे आतापर्यंत ७२४ प्रकरणे समोर आली आहेत. यातील ६६ लोक ठीक झाले आहेत. तर २० लोकांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी एकाच दिवसात ६ लोकांना मृत्यू झाला होता. या दरम्यान कोरोनाशी लढण्यासाठी शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्टने मुख्यमंत्री मदत निधीत ५१ कोटी रुपये दान केले आहे.


Protected Content

Play sound