मुंबई वृत्तसंस्था । राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची वाढत होत आहे. दिवसभरात तब्बल १७८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे एका दिवसातील मृत्यूचा हा सर्वोच्च आकडा आहे. त्यामुळे आता राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ४ हजार १२८ वर पोहोचला आहे. या १७८ पैकी २९ मृत्यू हे गेल्या दोन-तीन दिवसातले आहेत.
राज्यात आज दिवसभरात २ हजार ७८६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख १० हजार ७४४ वर पोहोचला आहे. तर दिवसभरात ५ हजार ७१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत ५६ हजार ४९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबईत आज दिवसभरात 1 हजार 67 नवे कोरोनारुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ही 59 हजार 201 वर पोहोचली आहे. तर, आज दिवसभरात एकूण 68 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे 2 हजार 248 जणांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरात 3 हजार 139 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.