कोरोना योध्दा सहाय्यक पोलिस निरीक्षक निता कायटे यांचा सत्कार

 

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक निता कायटे यांनी कोरोनाची भीती न बाळगता केलेल्या कामामुळे सातगाव ग्रामस्थांनी कोरोना योद्धा म्हणून त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

सहाय्यक पोलिस निरीक्षक नीता कायटे यांनी गेल्या पाच महिन्यापासून पिंपळगाव (हरे.) पोलीस स्टेशनचा कार्यभार स्वीकारला आहे. तेव्हापासूनच अवैध धंद्या विरोधात जोरदार मोहीम आखल्यामुळे अनेकांचे अवैध धंदे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. सुरुवातीला महिला पोलिस अधिकारी काय करेल ? म्हणून अवैध धंदे करणाऱ्यांना जणूकाही आनंदच झाला होता. मात्र सपोनि कायटे यांच्या धडक कारवाईमुळे, मॅडम काय करतील हे चुकीचे ठरल्याची परिसरात जोरदार चर्चा आहे.

यावेळी दुर्गा उत्सव निमित्त शांतता कमिटीची बैठकही पार पाडण्यात आली. सर्व दुर्गा मंडळाच्या अध्यक्षांना बोलावून शासनाच्या नियमांचं पालन काटेकोर झालं पाहिजे. असे यावेळी कायटे मॅडम म्हणाल्या. अवैद्य धंदे, स्त्रियांवर होणारे अत्याचार, गरिबांची पिळवणूक असे ज्याठिकाणी दिसेल, ती माहिती गुपचूप मला कळवावी असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी उपसभापती अनिता पवार, वि.का.सो. चेअरमन प्रल्हाद वाघ, पोलिस पाटील, दत्तू पाटील, डी. आर. वाघ, भागवत पवार, ज्ञानेश्वर अहिरे, शंकर पवार, सुनील मराठे, तलाठी रूपाली रायगडे, सुनील डांबरे, बहादुर पाटील, दिलीप पाटील, दिपक परदेशी, सागर चौधरी तसेच सर्व दुर्गा मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते.

Protected Content