कोरोना योद्ध्यांचा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

 

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केन्द्रा अंतर्गत उपकेंद्र आडगाव येथे कोरोना योद्ध्यांचा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता. 

सन्मान सोहळ्यात रुग्ण कल्याण समिती किनगावचे अध्यक्ष अरुणा पाटील,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. जमादार, माजी जिल्हा परिषद सदस्य आर. जी. नाना पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमन्त बऱ्हाटे  यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र किनगावच्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्याचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सर्व उपस्थित पदाधिकारी यानी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केलीत व अशाच प्रकारे या पुढे ही कोरोना विषाणु संसर्गाच्या संकटाचा सामना करण्याबाबत प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. मनीषा महाजन व त्यांचे सर्व सहकारी यानी आशा डे व  महिला दिनाचे औचित्य साधत अतिशय उत्कृष्टरित्या कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा दिलेल्या माजी समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका तसेच परीचारीका यांचा कर्तव्यपुर्ती सन्मानाचा कार्यक्रम करण्यात आला.  तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमा शंकर जमादार यांनी कोरोना संसर्गाच्या काळात नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोणातुन उपकेंद्राच्या कामकाज व इतर स्वच्छते विषयी जागृत राहुन केलेल्या कार्याचे समाधान व्यक्त केले. किनगाव प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा महाजन व त्यांच्या सर्व कर्मचारी यांनी एक संघ केलेल्या आरोग्याच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

 

 

 

 

Protected Content