मुंबई प्रतिनिधी । देशात कोरोनाच्या संसर्गासाठी हॉटस्पॉट बनलेल्या शहरांमध्ये मुंबई व पुण्याचा समावेश असून येथे पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येणार असल्याची माहिती आज देण्यात आली.
राज्य सरकारने कोरोनाच्या प्रतिकारासाठी खूप प्रयत्न केले असले तरी स्थिती आटोक्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, देशभरातील कोरोनाच्या संसर्गावर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मंत्रिगटाची स्थापना केली असून सहा मंत्रिगटाचं हे पथक देशातील चार राज्यांमधील प्रमुख शहरांना भेटी देणार आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी जाऊन केंद्रीय पथक पाहणी करणार आहे. करोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्या दृष्टीने ही पाहणी महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये हे पथक भेट देणार आहे. लॉकडाउनच्या नियमांचं पालन होतंय की नाही? केंद्र सरकारने लॉकडाउन दरम्यान जे नियम सांगितले आहेत त्यांचं उल्लंघन होत नाही ना? उल्लंघन झाल्याच्या राज्यात किती तक्रारी आहेत या सगळ्याचा आढावा हे पथक घेणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००