मुंबईः वृत्तसंस्था । कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईची स्थिती आता पुन्हा सुधारत आहे. सप्टेंबरमहिन्यात मुंबईत पुन्हा रुग्णवाढीच्या संख्येनं उसळी घेतली होती त्यातुलनेनं ऑक्टोबर महिन्यात रुग्णांची संख्या कमी आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. मुंबईमध्ये मागील ९ दिवसांत १९ हजार ९०६ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, १९ हजार ७५१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ऑक्टोबरमध्ये रिकव्हरी रेट २ टक्क्यांनी वाढला आहे चाचण्यांचे प्रणाण वाढवले आहे असं मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी म्हटलं आहे.
मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्यांही कमी झाली आहे. ३० सप्टेंबरला मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २६ हजार ५४० होती ३० सप्टेंबरला मुंबईचा रिकव्हरी रेट ८२ टक्के होता. जो, ९ ऑक्टोबरला ८४ टक्क्यांवर पोहोचला आहे.
बोरीवली व अंधेरी पूर्व व पश्चिमसह कांदिवली आणि दहिसर परिसरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण थोडे कमी आहे . कारण या परिसरात रुग्ण मुंबई व्यतिरिक्त अन्य वॉर्डातून सापडत आहेत. ग्रोथ रेट जास्त आहे. दक्षिण मुंबईत स्थिती सुधारतेय. माझी कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाचा परिणाम १५ ऑक्टोबरनंतर मुंबईत पाहायला मिळत आहे, असं पालिकेच्या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं .