मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या बाबत उपाययोजना करायला थोडा उशीर झालाय. पण सरकारने योग्य पावले उचलली आहेत. यासाठी मी सरकारचं अभिनंदन करतो, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे.
राज्यात होत असलेल्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारने केलेल्या उपाययोजनांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केले आहे. राज म्हणाले, यासंदर्भात काल माझे मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद करण्यात आली आहे. पण आता पुढे जाऊन देशांतर्गत विमान वाहतूकही थांबवायला हवी, अशी सूचना आपण मुख्यमंत्र्यांना केली,असेही राज ठाकरे यांनी सांगितले आहे.