आदेशाची पायमल्ली: जळगावातील एसटी वर्कशॉपमध्ये ८० टक्के कर्मचारी कामावर (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूला आटोक्यात आणण्यासाठी राज्यात कलम १४४ कायदा लागू करण्यात आला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या ५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थित हवी असतांना जळगावातील एसटी वर्कशॉप मात्र सुरू असून ८० टक्के कर्मचारी कामावर आहे. एसटी विभागाने एक प्रकारे शासनाची पायमल्ली केली असून महामंडळाच्या कारभाराविरोधात कर्मचाऱ्यांनी ‘एलटी’समोर संताप व्यक्त केला.

कर्फ्यूच्या दिवशीही कर्मचारी कामावर
एकीकडे देशात मोठ्या प्रमाण कोरोना विषाणू आटोक्यात आणण्यासाठी रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. यावेळी सर्व कार्यालये, दुकान, खानावळ आणि दुकाने बंद ठेवण्यात आली होती. रविवारी देखील जवळपास अनेक कर्मचारी वर्कशॉपमध्ये काम करत होते, अशी प्रतिक्रिया येथील वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्युजशी बोलतांना सांगितले.

दरम्यान, विभागीय उपयंत्र अभियंता पंकज महाजन आणि विभागीय यंत्र अभियंता एस.एस. सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. तर इतर वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता ते कार्यालयीन बैठकीत उपस्थित असल्याचे सांगितले. याबाबत कर्मचाऱ्यांना केवळ शासकीय नियमानुसार ५ टक्के उपस्थिती असावी, यासाठी वरिष्ठांना निवेदन देण्यात येणार आहे. अशी माहिती विभागीय एसटी कामगार सेनेचे सचिव आर.के. पाटील यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपययोजना नाही
बसेस मधून मोठ्या प्रमाणावर प्रवाशांनी प्रवास केलेला असतो. यासाठी अनेक बसेस स्वच्छता करण्यासाठी कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनिटायझर या सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही, तर मागणी केली असता अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे देखील यावेळी सांगितले. कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असे असतांना वरीष्ठांना कोणताही कार्यशाळा बंद ठेवण्यात आदेश आले नसल्याचे सांगण्यात आले आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/210293966872992/

Protected Content