कोरोना : मागील २४ तासात १०० अधिक रुग्णांचा मृत्यू

मुंबई (वृत्तसंस्था) मागील २४ तासात देशभरात कोरोनाची लागण झालेले ५०५ नवे रुग्ण समोर आले आहेत. देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढून चार हजारांच्या पार पोहोचली आहे आणि १०० अधिक जणांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत.

कोरोनाच्या प्रसारात एक स्पष्ट भौगोलिक दृष्टीकोनही आहे. देशातील ६२ जिल्ह्यात तब्बल ८०० टक्के कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. १४ एप्रिल रोजी देशातील लॉकडाऊन संपल्यानंतरही या जिल्ह्यांमध्ये सक्ती कायम राहण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तवली आहे. देशात आतापर्यंत २७४ जिल्ह्यांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट आहे. मागील २४ तासात देशभरात कोरोनाची लागण झालेले ५०५ नवे रुग्ण समोर आले आहेत. देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढून चार हजारांच्या पार पोहोचली आहे आणि १०० अधिक जणांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत.

Protected Content