Home Uncategorized कोरोना : महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ३३६ वर पोहचली

कोरोना : महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ३३६ वर पोहचली


मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्रात बुधवारपर्यंत कोरोनाबाधित ३३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यानुसार आता राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ३३६ झाली आहे.

 

कोरोनामुळे बुधवारी ६ मृत्यूंची नोंद झाली आहे. यातील ५ मृत्यू मुंबईत आणि १ मृत्यू पालघरमध्ये झाला. बळींचा आकडा १६ वर पोहोचला आहे. मुंबईत एका २६ वर्षांच्या ओल्या बाळंतिणीसह तिच्या ६ दिवसांच्या बाळालाही कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान, देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच दिवसात दररोज सरासरी १७.४ टक्के कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमुळे सुरुवातीच्या काळात मिळालेला फायदा आपण गमावू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound