भुसावळ प्रतिनिधी । भुसावळातील हॉटेल गॅलक्सीत परराज्यातील तरूणी आणि तरूणी रहिवास असल्यांची माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीसांना मिळताच घटनास्थळी जावून दोघांची चौकशी करण्यात आली.
अधिक माहिती अशी की, भारतातमध्ये कोरोना व्हायरस दाखल झाला आहे. यावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीचे प्रयत्न सुरू आहे. यासाठी आज रविवार 22 मार्च रोजी जनता कर्फू संपूर्ण भारतात सुरू आहे. रेल्वे स्टेशन, बस स्थानक, शहरातील बाजारपेठ सर्व बंद ठेवण्यात आलेले आहे. भुसावळातील जनता पोलिसांना चांगला प्रतिसाद देत आहे.मेडिकल सुरू ठरवण्यात आलेले आहे.मात्र रस्त्यांवर बाकी शुकशुकाट दिसत आहे.
बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांना नॅशनल हायवे क्रमांक ६ वरील हॉटेल गॅलक्सी सुरू असून यामध्ये जपान एक तरुण तर बैग्लोर वरून एक तरुणी येऊन रहिवास करीत असल्याची माहिती मिळताच निरीक्षकांनी पोलीस कर्मचाऱ्यांनी आज सकाळी 11.00 वाजेच्या दरम्यान सोबत घेऊन हॉटेल गॅलक्सीमध्ये जाऊन विदेशाची चौकशी केली. हॉटेल मालकांनी विदेशी असल्याची माहिती पोलीस स्टेशनला कळविली नसल्याने त्यांना तंबी दिली व नोटीस बजाविण्याचे आदेश दिले. तसेच निरीक्षकांनी डॉक्टरांच्या टीमला तपासणीसाठी हॉटेलला येण्यास सांगितले. जनता कर्फूला भुसावळात चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांनी दिली.