जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी भारतीय जैन संघटना (बीजेएस) राज्य शासनाला सर्वतोपरी सहकार्य करीत आहे .यानुसार संघटनेतर्फे रक्तदान शिबिरांचे आयोजनकरून रक्त पिशवी जमा करण्यात येणार आहे. त्या राज्य शासनाच्या ३०० पेक्षा अधिक ब्लड बँकांमध्ये देण्यात येणार आहे.
ब्लड डोनेशनची आवश्यकता : मागील महिन्यापासून कोरोनाची लागण महाराष्ट्रात झाल्यापासून ब्लड डोनेशन कॅम्प आयोजन करण्यासाठी मर्यादा येत होत्या. त्यामुळे बऱ्याच रक्तपेढ्यामध्ये रक्ताची कमतरता भासत आहे. बीजेएमने महाराष्ट्रातील तालुका पातळीवरती ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करून १५ एप्रिलपर्यंत २० हजार रक्तच्या बाटल्या शासनाला उपलब्ध करून देण्याचे मिशन हाती घेतलेअसल्याची माहिती भारतीय जैन संघटना संस्थापक शांतिलाल मुथ्था यांनी दिली आहे.