लंडन (वृत्तसंस्था) शनिवारी ब्रिटनमध्ये एकाच दिवसात ७०८ जणांच्या मृत्यू झाला आहे. तर, करोनाबाधितांची संख्या ४० हजारांहून अधिक झाल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.
ब्रिटनमध्ये करोनामुळे आतापर्यंत चार हजार ३१३ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी, ७०८ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर, शुक्रवारी ३ एप्रिल रोजी ६८४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. करोना संसर्गानेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची वैद्यकीय तपासणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आतापर्यंत एक लाख ८३ हजारजणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ४१ हजार हजार ९०३ जणांना करोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे.