जळगाव प्रतिनिधी । कोरोना बाधीतांची संख्या वाढत असतांनाच आता याच्या संसर्गामुळे होणार्या मृतांच्या संख्येत घट होत नसल्याने आरोग्य यंत्रणांसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत.
जळगाव जिल्हा कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेल्या पॉझिटीव्ह रूग्णांमध्ये पूर्णपणे तंदुरूस्त होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. आजवर २३ रूग्ण हे बरे होऊन घरी गेलेले आहेत. तर दुसरीकडे मृतांचे प्रमाण देखील वाढल्याचे दिसून येत आहे. रविवारी तीन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये जळगाव शहरातील ५० व ५३ वर्षीय हे दोन प्रौढ व चोपडा येथील ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
जिल्ह्यात आजवर १८० कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून यातील २५ रूग्ण आजवर दगावले आहेत. देश व राज्यातील मृतांच्या टक्केवारीच्या तुलनेत हे प्रमाण कितीतरी अधिक असल्याचे स्पष्ट झालेले आहे. तर अजून काही कोरोनाबाधितांची प्रकृती ही चिंताजनक असल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००