चाळीसगाव प्रतिनिधी । मालेगाव येथील मृत कोरोना बाधिताच्या संपर्कात चाळीसगाव येथील सहा जण आले असल्याची माहिती समोर आल्यानंतर या सर्वांना संशयित म्हणून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, मालेगाव येथील मृत कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चाळीसगाव येथील ६ संशयितांना चाळीसगाव येथून जळगाव हलवण्यात आले आहे. संबंधीत सर्व जण मालेगाव येथील कोरोना बाधिताच्या नात्यागोत्यातील असून त्यांची मालेगाव येथील बाधित मृतकाच्या दफनविधीला उपस्थिती होती. ही माहिती मिळाल्यानंतर खबरदारी म्हणून नगरपालिका प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसिलदार अमोल मोरे यांनी रथगल्ली आणि यांचा रहीवास असलेला कसाईवाडा सील करण्यात आला असून नागरिकांना घराबाहेर न निघण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या संदर्भात आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी लवकरच हा पूर्ण परिसर निर्जंतुक करण्यात येईल, कृपया सर्वांनी लॉकडाऊन काटेकोरपणे पाळावा व प्रशासनाला सहकार्य करावे ही विनंती. तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता घरीच सुरक्षित राहावे असे आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००