कोरोना : पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझर व्हॅन

जळगाव प्रतिनिधी । सध्या देशात मोठ्या प्रमाणावर कोरोणा व्हायरसने थैमान घातले आहे. यामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझर व्हॅनची सुरूवात करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १० दिवसांपासून जिल्ह्यात संचारबंदी लागू असतांना पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्या निर्जतुकीकरणा करीता सॅनिटायझर व्हॅन सुरू करण्यात आले आहे. शहरात लावलेला बंदोबस्ताच्या ठिकाणी दिवसातून तीनवेळा जावून तपासणी पोलीसांचे निर्जंतूकीकरण करणार आहे.

Protected Content