पहूर, ता. जामनेर रवींद्र लाठे । कालच मेहरूण येथील एक रूग्ण कोरोनाच्या चाचणीत पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याने नाचणखेड्यातील डॉक्टरकडे उपचार घेतल्याची माहिती मिळाल्याच खळबळ उडाली. दरम्यान, संबंधीत डॉक्टरसह इतरांना होम क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तालुक्यातील नाचणखेडा येथील रहिवासी असणार्या एका डॉक्टरचा दवाखाना मेहरूण भागात आहे. याच परीसरातील रहिवासी असलेला कोरोना रुग्ण परदेशातून आल्यानंतर त्रास होत असल्याने या डॉक्टरकडून दि. १८ मार्चपासून उपचार घेतले आहे. दरम्यान, हा डॉक्टर मध्यंतरी एक दिवस आपल्या गावी आला होता. यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्यांनाही याचा संसर्ग झाला की काय अशी शंका आली. त्यानुसार याची माहिती तहसीलदार अरूण शेवाळे यांना देण्यात आली. त्यामुळे संबंधित डॉक्टरला हलविण्याच्या सुचना तहसिदारांनी केल्याने शनिवारी रात्रीच डॉक्टर आपल्या कुटुंबासह वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. त्यांना १४ दिवसांचे होम क्वॉरंटाईन सांगण्यात आले आहे. तर रविवारी सकाळी पहूर पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी, पोउनि अमोल देवडे, ईश्वर देशमुख व दिनेश लाडवंजारी यांनी नाचनखेड्यात जावून संपूर्ण पाहणी करून घराबाहेर न पडण्याच्या सुचना दिल्या आहेत. गावात एक पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी ठेवला आहे. वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकार्यांसह पथकाने गावात जावून प्रत्यक्ष डॉक्टरांच्या संपर्कातील नातेवाईक व नागरिक यांच्या कडून माहिती जाणून घेतली.
यादरम्यान सर्वांची लक्षणे निगेटिव्ह असून खबदारीसाठी सर्वांना चौदा दिवस होम क्वारंटाईन राहण्याच्या सक्तीच्या सुचना दिल्या आहेत. याचबरोबर ग्रामपंचायत सरंपच व पदाधिकार्यांची बैठक घेऊन सपूर्ण गाव सँनेटायझर ची फवारणी करून निर्जंतुकी करण करण्याचे सांगितले. नागरीकांनी घाबरण्याचे काम नसल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान, कोरोना बाधीत रुग्णाचे जामनेर येथील सहा नातेवाईक व चालक यांनादेखील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.