कोरोना : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये जमावबंदी लागू होण्याची शक्यता

पुणे (वृत्तसंस्था) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईप्रमाणेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येही जमावबंदी लागू होण्याची शक्यता आहे. पोलिस आयुक्तालयात त्यावर ड्राफ्ट बनवण्याचे काम सुरू आहे.

 

राज्यातील सर्वाधिक म्हणजेच १६ कोरोनाग्रस्त पुण्यात आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईप्रमाणेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येही जमावबंदी लागू होण्याची शक्यता आहे. पोलिस आयुक्तालयात त्यावर ड्राफ्ट बनवण्याचे काम सुरू आहे. पिंपरी चिंचवड मध्ये जमावबंदीचा प्रस्ताव कालच जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिला होता. आता त्यामधे पुण्यातील काही भागांचाही समावेश होईल. मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बोलणे झाले की जाहीर करण्यात येणार आहे.

Protected Content