पारोळा विकास चौधरी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनासह ग्रामपातळीवरही उपाययोजना करण्यात येत आहे. सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून शहरातील ऐतिहासीक सात दरवाजापैकी पाच दरवाजे बंद करण्यात आले.
पारोळा शहरातील ५ दरवाजे बंद पारोळा शहर हे झाशीच्या राणीचे माहेरघर असून या पारोळ्या गावाला सुरक्षेच्या दृष्टीने गावात येण्याऱ्या जाण्यासाठी ७ दरवाजे ठेवण्यात आलेले होते. आजूबाजूला सुरक्षा भिंत बांधण्यात आलेली होती. कोरोना विषाणूंच्या बाहेरून येणाऱ्या व्यक्तीपासून लागण होऊ नये म्हणून शहरातील नागरिकांनी प्रवेश बंद केला आहे. नगरपालिकेने पारोळा शहराला बाहेरील ५ दरवाजे बंद करण्यात आले आहे. तर दोन दरवाजे येण्या-जाण्यासाठी पोलिसांच्या सुरक्षेच्या देखरेखीखाली सुरू ठेवण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००