पारोळा प्रतिनिधी । कोरोना विषाणूंच्या प्रसार होऊ नये यासंदर्भात देशात लॉकडाऊन केलेले असतांना लॉकडाऊनमध्ये टू-व्हीलर, फोर-व्हीलर गाडी रस्त्यावर फिरू नये असे सांगण्यात आलेले आहे. या पार्श्वभूमीवर पारोळा पोलीसांनी १५ जणांवर कारवाई करत त्यांच्याजवळ दुचाकी जप्त करण्यात आले आहे.
शहरात संचारबंदी लागू असतांना शहरात अत्यावश्यक सेवेसाठी फक्त गाड्यांचा वापर आणि पेट्रोल देण्यात येत असून सुद्धा टवाळखोर मुले दिवसभर रस्त्यावर दुचाकी घेऊन राष्ट्रीय महामार्ग ६ वर, बाजारपेठेत शहरांमध्ये विनाकारण बघ्याची भूमिका घेऊन हिंडत असतात. यासंदर्भात २८ रोजी मोटारसायकल टू व्हीलर व फोर व्हीलर गाडी घेऊन रस्त्यावर व संपूर्ण पारोळा तालुक्यात हिंडू नये. असे जाहीर करण्यात आले असून सुद्धा टवाळखोर गावभर फिरत असतात म्हणून पारोळा पोलीस निरीक्षक कानडे साहेब यांनी आपल्या साथीदारांसह स्वतः टू व्हीलरवर फिरणारी टवाळखोर मुलांविरुद्ध व नागरिकांन विरुद्ध दिनांक ३० रोजी सायंकाळी सुमारे ७ ते ८ वाजेच्या दरम्यान १० जणांविरुद्ध भा.द.वि.कलम १८८ प्रमाणे कारवाई करण्यात आलीअसून बाकी टवळखोरांच्या विरोधात कारवाई करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
कारवाई झालेल्यांची नावे खालीलप्रमाणे
१) राकेश भिला पाटील रा. पळासखेडे २) अंकुश नाना सोनवणे रा. जोगलखेडे ३) भिकन गोविंदा पाटील रा. व्यंकटेश नगर ४) सुनील इंदल पवार रा.रामनगर ५) राकेश भिकाजी मोरे रा. भडगाव (यशवंत नगर) ६) विनोद श्रावण पाटील रा.मंगरूळ ७) किशोर बारकु शिंपी रा.वर्धमान नगर ८) धरमसिंग दामू पाटील रा.सारवे ९) कृष्णा पुंजू माळी रा. बाभळेनाग १०) यशवंत मधुकर केदार रा. लक्ष्मण तात्या नगर यांच्यावर पारोळा पोलिसात अजून पाच ते सहा जणांना उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.