कोरोना : धरणगाव येथे रेशन दुकानदार यांना संरक्षण किट देण्याची मागणी

 

धरणगाव, प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी कोरोना फायटर यांना विशेष सुविधा देण्यात येत आहे. त्यांच्याप्रमाणेचे रेशन दुकानदारांदेखील संरक्षण किट देण्यात यावे अशी मागणी रेशन दुकानदारांनी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धरणगाव येथील रेशन दुकानदार यांना कोणत्याही प्रकारची विमा कवच नाही किंवा कोणतेही किट नाही. त्यांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण नाही. डॉक्टर व पोलिस, अंगणवाडी सेविका, शासकीय अधिकारी यांना ५० लाखांच्या विम्याचे सरंक्षण आहे. त्यांच्याप्रमाणेच दुकानदारांला कोणताही विमा नाही. दुकानदारांना परीवार नाही का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. रेशन दुकानदार त्यांचा जिव धोक्यात घालून धान्य वाटप करीत आहेत. शासनाने लवकरात लवकर दुकानदार यांना देखील संरक्षण तसेच मदत मिळावी अशी मागणी रेशन दुकानदार करीत आहेत.

Protected Content