धरणगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचार बंदी लागू झाली आहे. यामुळे शहरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री होत असल्याची व्यथा नागरिकांनी ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’कडे मांडली आहे.
या संदर्भात अधिक असे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचार बंदी लागू झाली आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता शासनाने सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री आहे. यात सर्वसामान्य नागरिक विनाकारण भरडले जात आहेत. आधीच रोजगार बुडतोय तशात नागरिकांना चढ्या दराने वस्तू विकत घ्याव्या लागत आहेत. दरम्यान, पालिका आणि महसूल प्रशासनाने चढ्या दरात विक्री करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.