कोरोना : धरणगावकरांनो…जीवनावश्यक वस्तू मिळणार घरपोच ; नगराध्यक्ष निलेश चौधरींचा सामाजिक उपक्रम

 

धरणगाव (प्रतिनिधी) कोरोनाचे संकट वाढत असल्यामुळे राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. परंतू जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी घराबाहेर निघण्याची सूट देण्यात आली आहे. पण धरणगावकरांना जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी सुद्धा घराबाहेर पडण्याचा धोका पत्करावा लागू नये, म्हणून या वस्तू घरपोच देण्याचा सामाजिक उपक्रम लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी सुरु केला आहे. दरम्यान, अशीच संकल्पना जिल्ह्यात राबविल्यास मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा नागरिकांना होऊ शकतो.

 

लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या पुढाकाराने शिवसेना शहरशाखा आणि माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी फाउंडेशन मार्फत जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी बाहेर निघण्याची गरज भासणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यानुसार शहरातील साधारण १५ ते २० शिवसेना कार्यकर्त्यांची एक टीम तयार करण्यात आली आहे. या पथकातील प्रत्येकाचा मोबाईल नंबर हा सार्वजनिक करण्यात आला आहे. त्यानुसार त्यांच्याशी संपर्क करून धरणगावकर आवश्यक त्या वस्तू घरपोच मागवू शकतात. अगदी ही सेवा २४ तास उपलब्ध राहणार आहे. यावेळी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी कोरोनाशी लढण्याची हीच वेळ आहे. जनतेने घरातच रहावे, बाहेर निघू नये. तसेच धरणगावकरांचे आरोग्य निरोगी रहावे, यासाठी हा उपक्रम राबवीत असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर, आपणाकडून सहकार्याची अपेक्षा करतो…आमची मेहनत आणि तुमचे सहकार्य पाहिजे, असेही श्री.चौधरी यांनी म्हटले आहे.

 

नाव आणि मोबाईल क्रमांक

 

अमोल अर्जुन चौधरी..
7662030288

परेश प्रल्हाद चौधरी..
9834030895

गोपाल संजय चौधरी..
7057293180

गोपाल संजय पाटील..
9156376723

मोहन संजय मराठे..
7507234170

अरविंद गुलाब चौधरी..
9021906305

विशाल विजय चौधरी..
9370676066

विनोद सुरेश रोकडे..
9545397172

समाधान सुभाष पाटील..
7770029125

नितीन प्रभाकर चौधरी..
9545653352

Protected Content