पिंपरी (वृत्तसंस्था) पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश दिले होते. परंतू या आदेशाचा भंग करणाऱ्या १६ दुकानदारांवर चिखली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
चिखली पोलिसांनी ध्वनीक्षेपकावरून परिसरातील सर्व नागरिकांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यानंतरही अनेक दुकानदारांनी पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत दुकाने सुरूच ठेवली. त्यामुळे चिखली पोलिसांनी १६ दुकानदारांवर भारतीय दंड विधान कलम १८८ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.