पहूर जा. जामनेर प्रतिनिधी । जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी व लढा देण्यासाठी आपली सामुहिक शक्ती म्हणून पहूर येथे रात्री ९ वाजता कोरोनावर मात करण्यासाठी सर्वानी दिवे, बॅटरी, तसेच मोबाईल टॉर्च लावून पुन्हा दिवाळी अनुभवली. यावेळी सर्वत्र दिव्यांचा झगमगाट दिसून येत होते.
कोरोना व्हायरस या महाभयंकर आजारावर मात करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजून ९ मिनिटांसाठी आपल्या घरातील सर्व दिवे बंद करून आपल्या गॅलरीत किंवा घरात तेलाचे दिवे, मेणबत्ती, कींवा मोबाईलची प्लॅशलाइट लावून आपली सामुहिक शक्ती दाखवा, असे आवाहन जनतेला केले होते.
त्यानुसार पहूर येथे सर्वानी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी आपल्या घरातील सर्व दिवे बंद करून आपल्या गॅलरीत व घरात तेलाचे दिवे लावण्यात आले, ठिकठिकाणी मेणबत्त्या लावण्यात आले. तसेच अनेकांनी मोबाईल प्लॅशलाइट लावले, तर अनेकांनी बॅटरी टॉर्च लावण्यात आले. यावेळी कोरोना व्हायरस या महाभयंकर आजारावर मात करण्यासाठी ठिकठिकाणी लावलेल्या दिव्यांच्या झगमगाटामुळे जणू पुन्हा दिवाळी पहूर करांनी अनुभवायला मिळली.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००