मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता दि.२३ मार्च (सोमवार) रोजी होणारा दहावीचा पेपर आता थेट ३१ मार्च नंतर होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
सोमवारी सामाजिक शास्त्रे पेपर-२ भुगोल, या विषयाचा पेपर होता. परंतू शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, सोमवारी होणारा पेपर आता ३१ मार्चनंतर होणार असून परिस्थिती पाहून पेपरची तारीख जाहीर करण्यात येईल, असे जाहीर केले आहे. दरम्यान, याआधी वर्षा गायकवाड यांनी दहावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु आता राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झालेली वाढ पाहता त्यांनी दहावीचा उर्वरित एक पेपर पुढे ढकलला असून तो ३१ मार्चनंतर होणार असल्याची घोषणा केली आहे.