कोरोना : जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई : भुजबळ

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या दहशतीमुळे भविष्यात कोणीही जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा आणि जीवनावश्यक काळाबाजार केल्यास त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

राज्यात कोरोना व्हायरसचा सर्वत्र उद्रेक झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा व जीवनावश्यक वस्तू जादा दराने विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जनतेस जीवनावश्यक वस्तू सहजासहजी आणि रास्तभावात उपलब्ध होणे सध्याच्या परिस्थितीत गरजेचे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार प्रतिबंध आणि सुरळीत पुरवठा अधिनियम १९८० मधील तरतुदीनुसार साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्या तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्या संबंधित रास्तभाव दुकानदार, इतर दुकानदार तसेच संबंधित व्यक्ती, संस्था यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

Protected Content