कोरोना : जिल्ह्यात दिवसभरात दोन बाधित रूग्ण आढळले

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात दोन बाधित रूग्ण आढळून आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज जळगाव शहर आणि चोपडा तालुक्यातील प्रत्येक एक असे एकुण दोन बाधित रूग्ण आढळून आले आहे. आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ७३७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार १५६ रूग्ण बरे होवून घरी परतले. आता सध्या सहा संक्रमित रूग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Protected Content